. My City Ratnagiri: Aapali Ratnagiri
Showing posts with label Aapali Ratnagiri. Show all posts
Showing posts with label Aapali Ratnagiri. Show all posts

Monday, December 25, 2023

एस. टी . काॅलनी रोड , रत्नागिरी

माळनक्याच्या एस. टी. आॅफीसच्या थोडं पुढून‌ आतमध्ये जो रस्ता जातो ना , तो एस. टी काॅलनीकडे जातो. आपण श्रो. प्रविण रेडीज यांच्या फेसबूक वाॅलवरून घेतलेला सुंदर फोटोच पाहू या....



Sunday, April 2, 2023

Ratnagiri videos

 A new page is added to display videos of my City Ratnagiri . It is a Ratnagiri Darshan through different videos. This is a first post ....


01. A short journey from Head Post Office to Z. P. Office in Ratnagiri .


02. Lovely Sakhartar bridge .



03. A rikshaw travel in jolting and jumping Ratnagiri city 😀😀😅😅



04. Visit the special place in Ratnagiri.



05. Weekly bazar of Ratnagiri City . An interesting and full of action video.



06. Celebrities in Ratnagiri....



07. Two poets who followed great poet Suresh Bhat and started writting Marathi Gazal first time in the history of Ratnagiri City. 






Sunday, February 6, 2022

Honey trap for Ratnagiri youth

रत्नागिरी शहरातलं दु:स्वप्नं ...

शहर निर्माण होतं. वाढतं. पसरत जातं. पसारा वाढत जातो तसं नियंत्रण सुटत जातं. शहर स्वतःचा आखीवरेखीवपणा सोडून सुटू लागते.  व्यवस्थांचा वाढणारा ताण शहराला हळूहळू पोखरू लागतो. शहर अनिष्ट गोष्टींच्या विळख्यात सापडते. कधी काळी सुखाने नांदणारे शिस्तबद्ध असलेले शहर गैरशिस्तीचे माहेरघर बनते. 


आभासी विश्वाच्या आहारी 

वास्तवात वाढणारे हे शहर अवास्तव दुनियेत जाऊन पोचते. त्याला आभासी स्वप्नांचा गलिच्छ विळखा कधी पडतो , ते त्याचे त्यालाच समजत नाही. शहर आभासी विश्वाच्या आहारी जाते आणि आभासी दुनियेचे एकेक कारनामे सुरू होतात. कर लो दुनिया मुठ्ठीमें म्हणत संगणक , लॅपटॉप ते मोबाईल क्रांतीच्या परमसुखाचा रेतीव बिंदू शहर गाठू लागते तेव्हा अनेक गुलाबी स्वप्नांची क्रांती होते ! मन मोहवून टाकणारी स्वप्नपूर्ती समोर दिसू लागते आणि अनेकांच्या गाडीचे ब्रेक्स फेल होऊ लागतात ! त्यांच्या मोबाईलवर येणारी मदमस्त दृष्ये जोरजोरात हलू लागतात , त-हेत-हेचे अंगविक्षेप करून तरूण जिवांची पार दैना उडवतात !  थोडी मज्जा वाटते . अजून थोडे, अजून थोडे...असे पुढे सरकत असतांनाच पायाखालची जमीन सरकली जाते. आभासी फोटो , व्हिडिओ आणि संभाषण यांनी पोरांचा बॅंक बॅलन्स सराईतपणे संपवलेला असतो. मग मुले आईवडिलांचा बॅंक बॅलन्स परस्पर रिता करु लागतात . याची जाणीव झाली की आपला मुलगा कसल्या गर्तेत सापडला आहे याची पालकांना कल्पना येऊन त्यांच्या डोळ्यासमोर भरदिवसा अंधार पसरतो. आता या हनी ट्रॅप मधून मुलाला बाहेर कसं काढायचं ? गेलेली इज्जत परत कशी मिळवायची ? अनभिज्ञ पालकांना आपलं मूल अशा काही जाळ्यात फसेल अशी पुसटशी कल्पनाही येत नाही. पण हे खरे आहे हे कळते तेव्हा त्यांना फार मोठा धक्का बसलेला असतो. 


धक्क्यातून सावरणे सोपे नाही


धक्क्यातून सावरायला फार वेळ लागतो . मुलगा अनैतिक मार्गाला लागलेला असतो. पैसा गेलेला असतो. समाजात मानहानी झालेली असते. आभासी समाजमाध्यमांमधून याचा गैरफायदा घेत समाजकंटक तरूणींच्या टोळया तयार करतात. त्या तरूणींमार्फत तरूणांना ब्लॅकमेलींगच्या जाळ्यात ओढतात. दुसऱ्यांना दु:खं देऊन , त्यांचा पैसा हडप करतात . ईज्जत संपवतात. इतकं सारं जगात घडवणारा तो हनी ट्रॅप आता रत्नागिरीत थैमान घालू लागला आहे. आणखी एक शहर विळख्यात ओढलं जातंय. इथली तरूणाई उध्वस्त होऊ घातली आहे. 


हनीट्रॅप रत्नागिरी बातमी स्त्रोत

हनी ट्रॅप


Sunday, January 30, 2022

The man who brought first Rikshaw in Konkan

  31 जानेवारी - 


कोकणात पर्यायाने रत्नागिरी शहरात पहिली पॅसेंजर रिक्षा आणणारे विष्णू लक्ष्मण गोगटे यांचा वाढदिवस / जयंती - 


जन्म -  31 जानेवारी, 1937 .

मृत्यू - 17 डिसेंबर, 2020 .


विष्णू यांचा जन्म 31 जानेवारी, 1937 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे व माध्यमिक  शालेय शिक्षण रत्नागिरी येथे झाले. फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथून 1956 साली ते एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडिलांचे रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे ल. V. Gogate & Sons नावाने दुकान होते.  घरच्या व्यवसायात सन 1956 ते 1970 या काळात जात असत.  

त्याकाळी रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक बैलांची सारवट, सायकल किंवा टॅक्सी मधून होत असे. 1970 च्या सुमारास वाघधरे  यांच्या गलबतातून त्यांना कालिकत येथे जाण्याची संधी मिळाली होती. कालिकत हे शहर रत्नागिरी शहरासारखेच. त्या परिसरात त्यावेळी रिक्षा व्यवसाय सुरू झाला होता. तिथूनच त्यांना त्यांच्या मनात असलेला रिक्षा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली  व त्यांनी पॅसेंजर ऑटो रिक्षा परमिट असलेली आणण्याचे ठरवले. 

त्यांनी रिक्षा परमिट मिळवण्यासाठी अर्ज केला परंतु परमिट मिळवण्यासाठी त्यांना 2 - वर्षे सतत पाठपुरावा करावा लागला होता. याकामी राजाभाऊ लिमये यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

बजाज कंपनीची रिक्षा बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेऊन त्यांनी आणली होती. रत्नागिरी शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान त्यांचाच. " वैशाली "हे त्यांच्या रिक्षाचे नाव. 7 फेब्रुवारी, 1972 रोजी लोकनेते शामराव पेजे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांनी रिक्षा व्यवसायाला प्रारंभ केला. शंकरराव पटवर्धन हे त्यांचे पहिले प्रवासी होत. 

रिक्षा व्यवसाय हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. सन 1998 पर्यंत ते रिक्षा व्यवसायात कार्यरत होते. रत्नागिरी रिक्षा संघटनेचे अनेक वर्षे ते पदाधिकारी होते. 

त्यानंतर तिलक नगर परिसरात गोगटे कम्युनिकेशन अँड जनरल स्टोअर्स नावाने काही वर्षे व्यवसाय केला होता. सन 2012 सालच्या मे महिन्यात 25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल त्यांचा रत्नागिरी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती व सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने तत्कालिन मा. जिल्हा न्यायाधीश विजय मुन्शी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. शालेय जीवनात पोहण्याची त्यांना विशेष आवड होती. याव्यतिरिक्त बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो -खो , कबड्डी इत्यादि मैदानी खेळातही त्यांचा सहभाग असायचा. 

रिक्षा व्यवसाय होताच असे असले तरी ते उत्तम बॅडमिंटन खेळाडूही होते. बरीच वर्षे ते बॅडमिंटन स्वतः जरी खेळत होते तरीही ते कोच म्हणूनही प्रसिद्ध होते. रत्नागिरी शहरातील अनेक बॅडमिंटनपटू त्यांनी तयार केले. अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता व अनेक बक्षीसेही मिळवली होती.  

रत्नागिरी बॅडमिंटनमध्ये रत्नागिरीतील आणखीन एक बॅडमिंटनपटू कै. डॉ. मु. न. पानवलकर यांच्यासोबत बॅडमिंटन डबल्सच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. रत्नागिरी शहरातील ही बॅडमिंटनमधली अभेद्य जोडी मानली जात होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर 45 वर्षांवरील वयोगटातील डबल्सचे उपविजेतेपद या जोडीने मिळवले होते. 

याव्यतिरिक्त अहमदनगर व  पुणे येथे सन 1982, 1984,1987,1992,1997 मध्ये खेळल्या गेलेल्या ओल्ड मॉंक्स व्हेट्रन बॅडमिंटन स्पर्धेत पाच वेळा ही जोडी विजयी ठरली होती.

1 ऑगस्ट, 2019 रोजी सर्वंकष विद्यामंदीरच्या बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन गोगटे- पानवलकर या जोडीच्या हस्ते झाले होते. 


17 डिसेंबर, 2020 रोजी वृद्धापकाळाने त्यांना देवाज्ञा झाली. 


अशा या विविधांगी  व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन . 


माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती नावासह Like & Share करण्यास हरकत नाही.

Tuesday, January 25, 2022

अरबी समुद्रात वादळ

 गेले काही दिवस मुंबईसह सर्व कोंकणात धुळीचे वादळ सुरु होतेच. त्यात आता नजिकच्या अरबी समुद्रात वादळी वारे सुरू झाले आहेत. थंडीचा कहर सुरू असतांनाच कोंकणात ऐन जानेवारीत पाऊसही अधूनमधून हजेरी लावतोय. एकीकडे आंब्यांच्या झाडांना मोहोर फुटत असतांनाच कोंकणात ह्या विचित्र नैसर्गिक घडामोडी घडत आहेत, हे विशेष. किमान गेल्या साठ वर्षांत कोंकणात असले काही घडले नव्हते. पण आता सातत्याने येणारी वादळे , त्यातही अरबी समुद्रात वाहते जोरदार वारे ज्यामुळे पुन्हा समुद्रात वादळे निर्माण होत आहेत. खालील लिंक वरून आपल्याला सद्य स्थितीत कोंकणात काय घडत आहे वा घडू घातले आहे याची ताजी कल्पना येईलच. संबंधित बातमीकारांचे बातमीबद्दल धन्यवाद. 

अरबी समुद्रात वादळी वारे 

Tuesday, May 25, 2021

Rs. 1500/- Help to Rickshaw drivers in Maharashtra


रिक्षाचालकांनी पंधराशे रुपये मदत मिळवण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या : 


https://t.co/8OWDmxrKws



अर्ज करण्यासाठी थेट लिंक :

 https://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme

............................

अधिक माहितीसाठी  ( ही लिंक  क्लिक करा) 


............................



Monday, May 24, 2021

Facebook pages and people of Ratnagiri

 




Here is a list of available links about #Ratnagiri city on Facebook....


ratnagirisanskrutik

रत्नागिरी सांस्कृतिक


Khalvayan

खल्वायन 


Ratnagiri

रत्नागिरी


KEVALCHILBE93/

रत्नागिरी


AamchiRatnagiri/

आमची रत्नागिरी


Hapus 

हापूस


Swarsandhya Ratnagiri

स्वरसंध्या रत्नागिरी



ratnagiriamachi/

रत्नागिरी आमची


ratnagiribeautiful

सुंदर रत्नागिरी


Prayas

प्रयास


rajmandirratnagiri

राजमंदिर आईस्क्रीम


Jeevandan group

जीवनदान ग्रूप रत्नागिरी



Divya Ratnagiri

दिव्य रत्नागिरी



Vyavasayik Ratnagiri

व्यावसायिक रत्नागिरी


rtngramdaivatbhairi

रत्नागिरी ग्रामदैवत भैरी


Karbhar Ratnagiricha

कारभार रत्नागिरीचा


amchiratnagiri/

आमची रत्नागिरी


Bramhnaad

ब्रम्हनाद


Aapali Ratnagiri

आपली रत्नागिरी


Patwardhan Highschool Ratnagiri

पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी


Saptasur-Musicals-Ratnagiri-

सप्तसूर म्युझिकल


Aapali Ratnagiri

आपली रत्नागिरी


..........................................

People in Ratnagiri


https://www.facebook.com/akashwani.ratnagiri.3

आकाशवाणी रत्नागिरी


https://www.facebook.com/janeevfoundationratnagiri

जाणीव फाऊंडेशन रत्नागिरी


https://www.facebook.com/mahavitaran.ratnagiri

महावितरण रत्नागिरी


https://www.facebook.com/ddratnagiri

सामाजिक वनीकरण


https://www.facebook.com/groups/274786699830086/?ref=share

वाहन खरेदी संघ


https://www.facebook.com/groups/1742827726030214/?ref=share

अभिव्यक्ती वाचन मराठीचे


Friday, May 7, 2021

Corona in Ratnagiri

 *🌍🔴रत्नागिरी वैभव ब्रेकिंग* 


 *रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेमध्ये सर्व* *प्रकारच्या खाजगी वाहनांची वाहतुक बंद करीत आहे* --- *जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा* 


 *अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी , आपत्ती* *व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर* 




*केवळ अत्यावश्यक सेवा वाहतुकीस मुभा*

*दुचाकी वाहन धारकांना आता हेल्मेट सक्ती*


रत्नागिरी दि. ७ : शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग (World Pandemic) घोषित केला असून, शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उपरोक्त संदर्भ अ.क्र.5 चे अधिसूचनेद्वारे करोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी " महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 " प्रसिध्द केलेले आहेत.


            सकाळी 07.00 ते 11.00 वाजता या वेळेत जीवनावश्यक वस्तुंसाठी (उदा. दुध, अन्नधान्य, भाजीपाला इ.) खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु यावेळेत रत्नागिरी आणि चिपळूण नगर पालिका हद्दीतील बाजारपेठेमध्ये दुचाकी वाहन चालक मोठया प्रमाणावर गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तसेच चिपळूण नगर पालिका हद्दीमध्ये काही दुचाकी वाहन चालक विनाहेल्मेट प्रवास करीत असून मोटार अधिनियम 1988 च्या कलम 129 या कलमाचा भंग करताना आढळून येत आहेत.


            तरी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांची वाहतुक बंद करीत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील मालवाहतुक वाहनांना मुभा राहील. आदेशाच्या पालनासाठी बॅरॅकेटींगची व्यवस्था पोलीस यंत्रणेने करावी. 


आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या  व हेल्मेट न वापरणाऱ्या  दुचाकी वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार पोलीस विभाग/उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी दंडात्मक कारवाई करावी असे आदेशात म्हटले आहे.

Sunday, March 21, 2021

PRAYAS RATNAGIRI

What is Prayas Ratnagiri ?

' Prayas Ratnagiri ' is a newly founded social institution in Ratnagiri. The style and the way of operation is best expressed in its slogan :  Prayas : world beyond the wall ! Prayas looks in the world beyond the wall and moves in it . Prayas wants to become a helping hand.  With all the regular help, it wants to establish a running help system or instant help on the spot of need.  Prayas means a try to catch a need and give all possible help immediately to the needy ones. It is a contact chain that operates,  reaches the spot and help the needy ones.  It does not mean that help should make the person lazy or unwilling to work . The help should give more inspiration to stand up and start up a new way, a new life ! The need of the moment and support to the needy , both are important.  Now many  Sensitive minded people are coming in Prayas ; however one man , Mr Yasin Patel , is all behind it . He has visualised it , seen it , ran it in his mind.  Not only he did that but he spotted the persons who will bring it into reality, gathered them , convinced them and it resulted in forming the executive committee of Prayas. Surprisingly enough the founder Mr Yasin Patel had rejected the post of President politely and has remained as a member of the executive committee . Now Mrs. Bharati Sansare, an ex Education Officer is a President of Prayas. Congratulations and best wishes to the respected President Madam and the whole executive committee of Prayas. The first meeting of the executive committee was held on 14th March 2021 at Government rest house Ratnagiri . Here is a photo .

Social Institute Prayas Ratnagiri


           The Executive committee of Prayas includes the following members. 

***********

Mrs. Bharati Sansare   : President

***********

Mr. Devidas Patil.         : Working President

************

Mr. Anand Shelar          : Vice President

Mrs. Manali Salavi        : Vice President

*************

Mr. Siddhesh Marathe  : Secretary   

**************

Mr. Shabbir Wasta.       :  Asstt. Secretary 

**************

Mr. Chintamani Sapre  :  Treasurer

**************

Mr. Ajay Baste.               :  Member

Mrs. Dinar Malgundkar : Member

Mr. Prakash Walanju      : Member

Mr. Ganesh Arekar         : Member

Mr. Yasin Patel               : Member

**************

Dr. Dilip Pakhare            : Advisor

Mr. Yuyutsu Arte            : Advisor

Adv. Sandeep Dhaval    : Advisor

***************

       The announcement of opening of Prayas was made live by Mr. Prakash Walanju (Watul news channel ) immediately after the meeting on 14th March 2021. 

   Now Prayas is in the registration process . Meanwhile Prayas has decided to start two projects in two villages in two different fields which will be announced shortly . We are going to have more news from Prayas ! 

Saturday, August 1, 2020

रत्नागिरी बाजारपेठ

लॉक डाऊन अनलॉक रत्नागिरी


कुठे लॉक डाऊन तर कुठे अनलॉक , कुठे लॉक डाऊन 7,8,9... तर कुठे अनलॉक 1,2,3.... खरे तर हे सगळे प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्याचेच प्रयत्न ! 
परवा रत्नागिरीतील एका नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी खरेदी करायला गेलो होतो. सोबत सौभाग्यवती होती. एका दुकानातली खरेदी आटोपून ती मला दुकानाबाहेर उभा करून दुस-या दुकानाकडे रवाना झाली. मग मी माझा उद्योग सुरू केला. तो कोरोनामुळे वर्दळीच्या या भागाची काय परिस्थिती झाली ते सांगण्यास पुरेसा आहे ! त्याचा हा व्हिडीओ ....


Monday, July 27, 2020

अभिमानास्पद अभिनंदनीय


कोरोना काळातील कला 


कलाकार  : श्री. कुंदन मयेकर , जोगेश्वरी , मुंबई 
          
                  मूळचे रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावचे. आई काळबादेवीचा आशिर्वाद आणि कलाकार श्री. कुंदन मयेकर यांच्या सुवर्णसंगमातून साकारली ब्राॅझसारखी दिसणारी कागदाची सुंदर श्रीमुर्ती ! 


रत्नागिरी टाईम्सच्या सौजन्याने मायसिटीरत्नागिरीच्या रसिक वाचकांसाठी ....
.................................................................................

रत्नागिरीमध्ये बरेच काही घडत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतांनाही, अनेक क्षेत्रात मंडळी कौतुकास्पद कार्य करीत आहेत ! प्राध्यापिका सौ. वसुंधरा जाधव या अशाच काही कर्तत्ववान व्यक्तिमत्वांपैकी आहेत . एका बाबतीत तर त्या एकमेव आहेत ! ही बाब जाणण्यासाठी पुढील बातमीच पहा ....



..........   

अशाच आणखी एक प्राध्यापिकेबद्दल आजच फेसबूकवर कौतुकास्पद लेखन वाचनात आलं.  त्या पोस्टची ही लिंक : 



उंच माझा झोका या ग्रूपला मन:पूर्वक धन्यवाद !



Friday, July 3, 2020

रत्नागिरीतून बरेच काही

सामान्य माणूस आजही प्रामाणिकपणा टिकवून आहे. हे आपण बातम्यातून बरेचदा वाचतो. अशीच एक बातमी वाचनात आली . चांगल्याचा प्रसार करण्यासाठी आम्ही ती इथे देत आहोत. 


चांगले काही

सौजन्य  : दै. रत्नागिरी टाईम्स 
दि. 03.07.2020
.............  




कोरोना प्रभाव




🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹







रत्नागिरीत काही गझलप्रेमी व गझलकार यांनी गझलमंथन हा व्हॉट्सॲप ग्रूप स्थापन केला आहे. 

               


यांसह श्री. अमेय धोपटकर व गझलकार श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील यांचाही या ग्रूपमध्ये सामावेश आहे.

.................

06.07.2020






   
(सौजन्य  : दै. रत्नागिरी टाईम्स )


.....................

#मि-याबंधारा


(सौजन्य  : दै. रत्नागिरी टाईम्स )
दरवर्षी पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर बनतो. समुद्राजवळील लोक जीव मुठीत घेऊन जगतात. चाळीसपन्नास वर्षे यावर कायम तोडगा निघत नाही , हे दुर्दैव आहे !


..................






(सौजन्य  : दै. रत्नागिरी टाईम्स )


.............







Thursday, July 2, 2020

Thanks Google Marathi




Dear friends and families, 

Google has added Marathi laungauge to the blogging world.  I must thank Google for this as my mothertoung is Marathi. Now I can post here in Marathi for the Marathi Readers and also for those non Marathi people who are egar to read in Marathi. I am giving a page in Marathi here to better understand what is going on in my city Ratnagiri. 

            धन्यवाद गुगल टीम ! आता तुमच्यामुळे ब्लाॅगवर मराठीत लिहिता येऊ लागले आहे ! बरेच दिवस मनात होते . मात्र, आज दि. 03.07.2020 रोजी या ब्लाॅगवर ' आपली रत्नागिरी ' नांवाचे एक पान मराठीतून सुरू करीत आहे. मराठी वाचकांसाठी हा थेट संवाद ठरेल , हा आनंद फार मोठा आहे.  जास्तीत जास्त मराठी वाचकांनी इथे भेट द्यावी व आपली रत्नागिरी पहावी , आपली मते द्यावीत , हीच विनंती !



            

            

Sunday, June 28, 2020

Corona Today in Ratnagiri

06 पॉझिटिव्हसह एकूण 560
एका महिला रुग्णाचा मृत्यू
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 28–जिल्ह्यात गेल्या 24 तासात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले यामुळे एकूण पॉझिटिव्ह रु्ग्णांची संख्या 560 झाली आहे.  कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण, रत्नागिरी  येथून 04 व कोव्हीड केअर सेंटर कोकण कृषि विद्यापीठ दापोली 3  रुग्ण, कोव्हीड केअर सेंटर घरडा 03 रुग्ण अशा 10 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या  रुग्णांची संख्या 430 झाली आहे.
    चिपळूण येथील 54 वर्षे वयाच्या महिला रुग्णाचा कोव्हीडने मृत्यू झाला.  त्यामुळे मृत्यूंची संख्या 25 झाली आहे.  मरण पावलेली सदर महिला 19 जून रोजी मुंबई येथून बेशुध्द स्थितीत दवाखान्यात दाखल करण्यात आली होती.  20 जून रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर महिलेस मधुमहे आणि मोठ्या प्रमाणावर किडनी इन्फेक्शन होते. दाखल झाल्यापासून सदर महिला बेशुध्दावस्थेतच होती तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार होती व ती व्हेंटिलेटरवर होती. 
                काल सायंकाळपासून  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 06 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे
1) साळवी स्टॉप ता.रत्नागिरी 
२) मु.पो.कोंडगे ता. लांजा
3) मु.पो. देवरुख ता. संगमेश्वर
४) गुहागर नाका ता.चिपळूण
५)  मु.पो. पन्हळे ता. लांजा
६) कामथे ता. चिपळूण
                सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 111  आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे.
                सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह - 560
बरे झालेले  - 430
मृत्यू  - 25
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह - 110 + 1
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
            जिल्ह्यात सध्या 48 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये,  गुहागर तालुक्यामध्ये   01, संगमेश्वर तालुक्यात 1,  दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 8 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 6 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
            संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी -  34, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी -  1,  उपजिल्हा रुग्णालय, कामथे - 3, , कोव्हीड केअर सेंटर पेढांबे-1,  उपजिल्हा रुग्णालय कळबणी - 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा लवेल-03,  कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली - 15 असे एकूण 58 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.  
 होम क्वारंटाईन 
          मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 20 हजार 05 इतकी आहे.
 आत्तापर्यंत 8 हजार पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह
            जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 9 हजार 142 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 8 हजार 854 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 560 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 8 हजार 262 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये अजून 288 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.  
    होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक,  नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
    सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे.  ही माहिती 27 जून 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.  यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो.  पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.

Tuesday, June 16, 2020

Heavy rain in Ratnagiri


  1. There has been raining heavily for last 3 to 4 days in Ratnagiri.  In fact, the weathercast was declared by the weather authority already. Here are some pictures from a Facebook post by Sainath Pednekar.  








These pictures are from the Shere Naka area in Ratnagiri.  The level of water will go on increasing if the heavy rainfall continues.   Let's hope it will not  ! Let's see what happens next.


Friday, May 29, 2020

Fire broke

Fire near Ratnagiri city. 


Fire broke in Killa area near Ratnagiri city on 24.05.2020 @08.30 pm. This place is very well known as the Ratnadurg Fort is situated here.  The fire is spreading around quickly.  The are has dense locality.  The houses are close to each other.  The fire brigade has reached the spot and is trying hard to control the fire.  The reason of fire is still unknown.