*🌍🔴रत्नागिरी वैभव ब्रेकिंग*
*रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेमध्ये सर्व* *प्रकारच्या खाजगी वाहनांची वाहतुक बंद करीत आहे* --- *जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा*
*अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी , आपत्ती* *व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर*
*केवळ अत्यावश्यक सेवा वाहतुकीस मुभा*
*दुचाकी वाहन धारकांना आता हेल्मेट सक्ती*
रत्नागिरी दि. ७ : शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग (World Pandemic) घोषित केला असून, शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उपरोक्त संदर्भ अ.क्र.5 चे अधिसूचनेद्वारे करोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी " महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 " प्रसिध्द केलेले आहेत.
सकाळी 07.00 ते 11.00 वाजता या वेळेत जीवनावश्यक वस्तुंसाठी (उदा. दुध, अन्नधान्य, भाजीपाला इ.) खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु यावेळेत रत्नागिरी आणि चिपळूण नगर पालिका हद्दीतील बाजारपेठेमध्ये दुचाकी वाहन चालक मोठया प्रमाणावर गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तसेच चिपळूण नगर पालिका हद्दीमध्ये काही दुचाकी वाहन चालक विनाहेल्मेट प्रवास करीत असून मोटार अधिनियम 1988 च्या कलम 129 या कलमाचा भंग करताना आढळून येत आहेत.
तरी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांची वाहतुक बंद करीत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील मालवाहतुक वाहनांना मुभा राहील. आदेशाच्या पालनासाठी बॅरॅकेटींगची व्यवस्था पोलीस यंत्रणेने करावी.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार पोलीस विभाग/उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी दंडात्मक कारवाई करावी असे आदेशात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment