06 पॉझिटिव्हसह एकूण 560
एका महिला रुग्णाचा मृत्यू
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 28–जिल्ह्यात गेल्या 24 तासात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले यामुळे एकूण पॉझिटिव्ह रु्ग्णांची संख्या 560 झाली आहे. कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण, रत्नागिरी येथून 04 व कोव्हीड केअर सेंटर कोकण कृषि विद्यापीठ दापोली 3 रुग्ण, कोव्हीड केअर सेंटर घरडा 03 रुग्ण अशा 10 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 430 झाली आहे.
चिपळूण येथील 54 वर्षे वयाच्या महिला रुग्णाचा कोव्हीडने मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूंची संख्या 25 झाली आहे. मरण पावलेली सदर महिला 19 जून रोजी मुंबई येथून बेशुध्द स्थितीत दवाखान्यात दाखल करण्यात आली होती. 20 जून रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर महिलेस मधुमहे आणि मोठ्या प्रमाणावर किडनी इन्फेक्शन होते. दाखल झाल्यापासून सदर महिला बेशुध्दावस्थेतच होती तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार होती व ती व्हेंटिलेटरवर होती.
काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 06 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे
1) साळवी स्टॉप ता.रत्नागिरी
२) मु.पो.कोंडगे ता. लांजा
3) मु.पो. देवरुख ता. संगमेश्वर
४) गुहागर नाका ता.चिपळूण
५) मु.पो. पन्हळे ता. लांजा
६) कामथे ता. चिपळूण
सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 111 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह - 560
बरे झालेले - 430
मृत्यू - 25
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह - 110 + 1
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 48 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, संगमेश्वर तालुक्यात 1, दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 8 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 6 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी - 34, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी - 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे - 3, , कोव्हीड केअर सेंटर पेढांबे-1, उपजिल्हा रुग्णालय कळबणी - 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा लवेल-03, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली - 15 असे एकूण 58 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वारंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 20 हजार 05 इतकी आहे.
आत्तापर्यंत 8 हजार पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 9 हजार 142 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 8 हजार 854 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 560 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 8 हजार 262 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये अजून 288 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती 27 जून 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.