. My City Ratnagiri: Heavy rain on 10 th & 11th June in Ratnagiri district

Friday, July 2, 2021

Heavy rain on 10 th & 11th June in Ratnagiri district

 The weather department has announced that there will be heavy rain in Ratnagiri district of Maharashtra State in India. There is a possibility of heavy thunderstorm, floods, etc. 

*रत्नागिरीतील 31 गावांना सावधानतेचा इशारा; पूराचा आणि दरडींचा धोका*


*रत्नागिरी* - जिल्ह्यात दहा व अकरा तारखेला ढगफुटीसारखा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. जिल्ह्यात नद्यांना पूर येऊन तिरावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. पूररेषेखाली येणाऱ्या ३१ गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे; तर ४५ ठिकाणे धोकादायक असून, तेथे दरड कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे गरजेनुसार स्थलांतर करण्यात येणार आहे. 

  जिल्ह्यात पूररेषेखाली येणाऱ्या ३१ गावांमध्ये प्रशासनानकडून संबंधित नागरिकांना आगाऊ इशारा दिला आहे.

       जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये ३१ गावे पूररेषेखाली आली आहेत. राजापूर तालुक्यातील राजापूर बाजारपेठ, काजिर्डा, डोंगर, पांगरी खुर्द, भाबलेवाडी ही पाच गावे, संगमेश्वर तालुक्यात साखरपा, कसबा, कुरधुंडा, नावडी, माभळे, वाशीतर्फे संगमेश्वर, कोळंबे, भडकंबा, पांगरी अशी नऊ, रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वर, हरचेरी, चांदेराई, टेंभ्ये ही चार, चिपळूण तालुक्यात पेठमाप, गोवळकोट, मजरेकाशी, खेर्डी, चिपळूण शहर ही पाच, खेडमध्ये खेड शहर, प्रभुवाडी, चिंचखरी, सुसेरी, असलुरे ही पाच, गुहागर तालुक्यात वडद, पालशेत, परचुरी ही तीन गावे यांचा समावेश आहे.


🟩. *न्यूजमंत्रा.कॉम*

No comments:

Post a Comment