. My City Ratnagiri: August 2020

Saturday, August 1, 2020

रत्नागिरी बाजारपेठ

लॉक डाऊन अनलॉक रत्नागिरी


कुठे लॉक डाऊन तर कुठे अनलॉक , कुठे लॉक डाऊन 7,8,9... तर कुठे अनलॉक 1,2,3.... खरे तर हे सगळे प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्याचेच प्रयत्न ! 
परवा रत्नागिरीतील एका नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी खरेदी करायला गेलो होतो. सोबत सौभाग्यवती होती. एका दुकानातली खरेदी आटोपून ती मला दुकानाबाहेर उभा करून दुस-या दुकानाकडे रवाना झाली. मग मी माझा उद्योग सुरू केला. तो कोरोनामुळे वर्दळीच्या या भागाची काय परिस्थिती झाली ते सांगण्यास पुरेसा आहे ! त्याचा हा व्हिडीओ ....